सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

अखेर 'पुष्पा-2' प्रतीक्षा संपली ! पोस्टर अन टीझरच्या रिलीज डेटची झाली घोषणा

पुजा    02-04-2024 18:46:51

मुंबई : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन अपकमिंग चित्रपट 'पुष्पा 2: द रूल'मुळे चर्चेत आहे. अल्लू अर्जनचे चाहते त्याच्या या चित्रपटाची वाट पाहत आहेत. या चित्रपटाबाबतचे एक-एक अपडेट्स जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. अशामध्ये अल्लू अर्जुन आणि निर्मात्यांनी 'पुष्पा 2: द रूल'चे पोस्टर रिलीज केले आहे. त्याचसोबत त्याने या चित्रपटाच्या टीझरच्या रिलीज डेटची देखील घोषणा केली आहे. निर्माते अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी या चित्रपटाचा टीझर रिलीज करणार आहे. 

अल्लू अर्जुननं शेअर केलेल्या पुष्पा-2 या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये घुंगरु घातलेले पाय दिसत आहे. या पोस्टरवर "टीझर ऑन 8.04.24", असं लिहिलेलं दिसत आहे. म्हणजेच येत्या 8 तारखेला पुष्पा-2 चित्रपटाचा टीझर रिलीज होणार आहे. अल्लू अर्जुननं शेअर केलेल्या पुष्पा-2 च्या पोस्टरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. अशातच अल्लू अर्जुननं पोस्टरसोबतच या चित्रपटाच्या टीझरची रिलीज डेट देखील जाहीर केल्यानं चाहत्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. पुष्पा 2 या चित्रपटाची प्रतीक्षा अल्लू अर्जुनचे चाहते करत आहेत. अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदान्ना पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

पुष्पा द रुल या चित्रपटातील अल्लू अर्जुनचा लूक काही महिन्यांपूर्वी रिव्हिल करण्यात आला होता. गळ्यात लिंबाची माळ, सोनेरी रंगाचे दागिने, हातात बंदुक अशा अल्लू अर्जुनच्या पुष्पा-2 या चित्रपटातील लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. पुष्पा द राइज हा चित्रपट 2021 मध्ये रिलीज झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटातील गाणी, अॅक्शन सीन्स आणि डायलॉग्स यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. आता प्रेक्षक या चित्रपटाची सिक्वेलची उत्सुकतेने वाट बघत आहेत.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती