सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

होय, खरंच तापसी पन्नूने मॅथियास बो सोबत बांधली लग्नगाठ ; लग्नाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

पुजा    04-04-2024 16:55:18

उदयपूर : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तापसी पन्नूने लग्न केल्याची चर्चा सगळीकडे होती. पण याबाबत तापसीने कोणत्याही प्रकारचं भाष्य अजून केलं नाहीये. तिच्या या सिक्रेट वेडिंगबाबत सगळीकडे साशंकता असताना तिच्या लग्नसभारंभातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तिचं लग्न झाल्याचं अखेर स्पष्ट झालं.  तापसी पन्नूने बॉयफ्रेंड मॅथियास बो सोबत लग्न केले. त्यांच्या लग्नाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण या कपलकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. 

असा दावा केला जात आहे की, तापसी पन्नू आणि मॅथियास बो यांनी उदयपूरमध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये तापसी पन्नू पंजाबी स्टाइलमध्ये नवरीसारखी नटून थटून मॅथियास बोकडे येते. मॅथियासने देखील शिख पद्धतीने लूक केल्याचे दिसत आहे. पण व्हायरल होणारा व्हिडीओ खूपच अस्पष्ट आहे. स्टेजवर उभा राहिलेल्या मॅथियासने शेरवानी घातली असून डोक्यावर पगडी बांधली आहे. या लूकमध्ये मॅथियासला ओळखणं देखील कठीण झआले आहे. तापसी पन्नू लग्नामध्ये खूपच उत्साहित दिसत आहे. नाचत नाचत ती स्टेजच्या दिशेने येते. 

तापसीने अनारकली स्टाइलचा पंजाबी सूट घातला होता आणि त्यासोबत तिच्या वेणीत परंडा, हातात चुडा आणि लांबलचक कलीरे घालते होते. पंजाबी स्टाइल वधूमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तापसी पन्नू बॉयफ्रेंड मॅथियासला वरमाला घालताना दिसत आहे. आधी तापसी मॅथियासला वरमाला घालते. त्यानंतर मॅथियास तापसीच्या गळ्यात वरमाला घालतो. तापसी भारतीय असली तरी मॅथियासने भारतीय संस्कृती ज्याप्रकारे स्वीकारली ते पाहून चाहते खूपच प्रभावित झाले. 

तापसी पन्नूने अद्याप लग्नाबाबत कोणतीही अधिकृत पोस्ट केलेली नाही. समोर आलेल्या कोणत्याही बातमीवर आणि व्हिडीओवर तापसी पन्नू किंवा तिच्या टीमकडून प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तापसीने लग्न केल्याची घोषणा न केल्यामुळे तिचे चाहते नाराज झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तापसी पन्नू आणि मॅथियास बो यांनी २३ मार्च रोजी उदयपूरमध्ये लग्न केले. लग्नाला दोघांच्याही कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती