सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

'वुमन आंत्रप्रुनर्स लीडरशिप डायलॉग' ला चांगला प्रतिसाद

डिजिटल पुणे    29-02-2024 09:59:06

पुणे : 'वुमन आंत्रप्रुनर्स   डेव्हलपमेंट कौन्सिल 'च्या वतीने 'एसएमई चेंबर ऑफ इंडिया','महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट असोसिएशन' च्या सहकार्याने  'वुमन आंत्रप्रुनर्स  लीडरशिप डायलॉग 'या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला.डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी (आंबी,पुणे) च्या कुलगुरू डॉ.सायली गणकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.हिल्टन हॉटेल, हिंजवडी  येथे २८ फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम झाला.डॉ.प्रीती सवाईराम (डेप्युटी प्रोजेक्ट डायरेक्टर,एग्रीकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी,महाराष्ट्र शासन), श्रीमती साक्षी कुलकर्णी (वुमन आंत्रप्रुनर्स   डेव्हलपमेंट कौन्सिलच्या संचालिका),श्रीमती स्मिता भोलाणे (संचालिका ,अर्थार्थ वेल्थ मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड), श्रीमती नमिता शेट्टी (फायनान्स ऑफिसर, डी लवाल प्रायव्हेट लिमिटेड), प्रा.डॉ.नेत्रा नीलम (संचालिका सिम्बॉयसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट अँड ह्यूमन रेसोर्स डेव्हलपमेंट)आदी मान्यवर सहभागी झाले.'एसएमई चेंबर ऑफ इंडिया' चे अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे यांनी डॉ. सायली गणकर यांचे स्वागत केले. महेश साळुंखे  यांनी परिचय करुन दिला.कार्यक्रमास पुण्यातील महिला उद्योजिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

'स्पर्धात्मक युगात, शाश्वत व्यवसाय वाढीसाठी धोरणात्मक नियोजन, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि दीर्घकालीन यशासाठी वचनबद्धतेचे संयोजन आवश्यक आहे.बाजारातील फरक: शाश्वत वाढीसाठी तुमची उत्पादने किंवा सेवा स्पर्धकांपासून वेगळे करणे आवश्यक आहे. यामध्ये ग्राहकांच्या गरजा अधिक प्रभावीपणे पूर्ण करणारी अनन्य वैशिष्ट्ये, उच्च दर्जाची किंवा नाविन्यपूर्ण समाधाने ऑफर करणे समाविष्ट असू शकते.स्पर्धेच्या पुढे राहण्यासाठी आणि नवकल्पना चालवण्यासाठी संशोधन आणि विकास (R&D) मध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. व्यवसायांनी नवीन तंत्रज्ञान एक्सप्लोर करण्यासाठी, नवीन उत्पादने विकसित करण्यासाठी आणि विद्यमान ऑफर सुधारण्यासाठी संसाधनांचे वाटप केले पाहिजे.असे प्रतिपादन डॉ.सायली गणकर यांनी केले. 

'उद्योजकांच्या वर अनेक जबाबदारी असतात परंतु उद्योग करताना नेहमी नवीन संधी शोधल्या पाहिजेत आणि त्याचा फायदा आपल्या उद्योगासाठी करून घेतला पाहिजे. उद्योग करताना नेहमी नवीन कल्पनांचा विचार करून बदलांचा सामना केला पाहिजे 'असे विचार डॉ. नेत्रा नीलम यांनी व्यक्त केले.डॉ. प्रीती सवाईराम यांनी महिला उद्योजकांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांची माहिती यावेळी महिला उद्योजकांना करून दिली. यामध्ये राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना, त्यांचे फायदे आणि त्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न करावे यावर त्यांनी महिला उद्योजकांना मार्गदर्शन केले. वुमन  आंत्रप्रुनर्स     डेव्हलपमेंट कौन्सिलच्या संचालिका श्रीमती साक्षी कुलकर्णी यांनी कौन्सिलच्या वतीने महिला उद्योजकांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजना तसेच उपक्रमांची माहिती आपल्या प्रास्ताविकात दिली. 

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती